Saturday , July 6 2019
Home / भारतातील प्राचीन विद्यापीठे / प्राचीन तक्षशिला विद्यापीठ (इ.स.पूर्व ८०० ते इ.स.४००) Takshashila ancient University

प्राचीन तक्षशिला विद्यापीठ (इ.स.पूर्व ८०० ते इ.स.४००) Takshashila ancient University

प्राचीन तक्षशिला विद्यापीठ( इ. स. पूर्व ८०० ते इ. स. ४०० ) Takshashila ancient University भारतातील प्राचीन विद्यापीठे Ancient Universities in India-भारतातील प्राचीन विद्यापीठातील तक्षशिला विद्यापीठ हे कालदष्ट्या सर्वांत जुने विद्यापीठ असे म्हणण्यास हरकत नाही.

प्राचीन तक्षशिला विद्यापीठ ( इ. स. पूर्व ८०० ते इ. स. ४०० ) Takshashila ancient University भारतातील प्राचीन विद्यापीठे Ancient Universities in India

 

रामायण व महाभारत या महाकाव्यांत तक्षशिलेसंबंधीचे उल्लेख मिळतात. जातकांच्या काळात तर या विद्यापीठाचे महत्त्व भारतवर्षातच नव्हे तर आशियाखंडाच्या इतर भागांप्रमाणे युरोपातही मान्य झालेले होते. या दृष्टीने हे विद्यापीठ म्हणजे एक आंतरराष्ट्रीय शिक्षणसंस्था झाली होती या शंका नाही. या विद्यापीठाचा विशेष प्रभाव मगध देशापासून पश्चिम इराणपर्यंत पडलेला होता. यात तत्कालीन पाथिया. मीडिया, इराक (मेसापोटेमिया) अरबस्तान वगैरेंचा समावेश होतो.

तक्षशिला ही नगरी प्राचीन काळात प्रसिद्ध असलेल्या गांधार देशाची राजधानी. गांधार देश म्हणजे बायव्य सरहद्दीवरील कंदाहार हा प्रांत. धृतराष्ट्रपत्नी महासती गांधारी या देशाच्या राजाची कन्या. अरायन या यवन इतिहासकाराच्या मतानुसार सिकंदराच्या वेळी हे शहर फार भरभराटीला आलेले होते. प्लिनीच्या म्हणण्याप्रमाणे या प्रदेशाला ‘ आमन्द ‘ असे नाव होते. या प्रदेशाच्या सुपीकतेची ग्वाही स्ट्रेनो, हयुएनत्सांग इत्यादी परदेशी प्रवाशांनी दिलेली आहे.

शैक्षणिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळविलेल्या या विद्यापीठात विद्याभ्यासासाठी प्रवेश मिळविण्याकरिता विद्यार्थ्यांची रीघ लागलेली असे. विद्वत्तेकरता प्रसिद्ध असणा-या काशीसारख्या प्रसिद्ध ठिकाणाहून सुद्धा राजपुत्र व श्रेष्ठीपुत्र शेकडो मैल चालत चालत या विद्यापीठात येत असत असे वर्णन जातकग्रंथात वाचावयास मिळते. अशा सुप्रसिद्ध विद्यापीठात कोणते विषय शिकविले जात असत याकडे लक्ष देणे आजही मनोरंजक ठरेल.

विविध विषयांचे शिक्षण (प्राचीन तक्षशिला विद्यापीठ)

प्राचीन काळी शिक्षणाचे विषय असंख्य असत असे म्हटले पाहिजे. या विषयांत वेदादी विषयांशिवाय १८ शिल्पे किंवा विद्या यांचा सामान्यपणे अंतर्भाव असे. या विद्यांत इतिहास, पुराण, राशी (गणित), नक्षत्रविद्या सर्पदंशज्ञान विद्या, भूत विद्या, शरीर-विज्ञान-चिकित्सा, शिल्पज्ञान वगैरेंचा समावेश होत असे. जाताकातील वर्णनाप्रमाणे तक्षशिला विद्यापीठातही ८ शिल्पांचा अंतर्भाव होता. “ तेसु बोधिसत्तो सोळसवस्सकाले तक्खसीलां गन्तवा दिसा मोक्खस्स आचरियस सन्ति तयो वेदे अट्ठारस सिप्पानि च उग्गण्हित्वा तस्साससिप्पे असीदसो हुत्वा वाराणसी पच्चागमि ” या शब्दांवरून हे स्पष्ट होते. १८ ही संख्या मुख्य विषयांवी. यावर अवलंबून असणारे इतर विषयही या विद्यापीत शिकविले जात होते. ऐच्छिक विषयांत जादूसारख्या विषयांचाही अन्तभव होता. ‘ तदा एको वाराणसी ब्राह्मणो माणवो तक्खसिलाय सव्वसिप्पनि उग्गणिहत्वा धनुक-में निफत्तिम् पत्तो चुल्लधनुग्गहपण्डितो नाम अहोसि ‘ या शब्दांवरून काही ब्राह्मण मुले युद्धकलेतही निष्यात होत असत असे दिसते.

काशीच्या राजाच्या पुरोहिताचा मुलगा जोतिपाल हा तक्षशिलेला धनुर्वेद शिकला व नंतर काशीच्या मुख्य सेनापतीपदावर नियुक्तही झाला. १८ शिल्पांशिवाय मुख्य धार्मिक विषय म्हणून वेद व वेदान्त यांचेही अध्यापन या विद्यापीठात होत असे. वेद तर मुखोद्गत करून घेण्याची प्रथा होती. या विद्यापीठात शिकविल्या जाणा-या १८ शिल्पांत मुख्यत्वेकरून हस्तिशिक्षा, मृगया, आयुर्वेद, धनुर्वेद, शिल्पकला (आजचे इंजिनियरिंग ) मूर्तिकला व चित्रकला यांचा समावेश होता असे निरनिराळया उल्लेखांवरून दिसते. या कलांच्या तान्त्रिक ज्ञानाबरोबर प्रात्यक्षिकांचाही समावेश होता हे निराळे सांण्याची गरज नाही धर्म व तत्त्वज्ञान हे त्या काळचे अत्यंत महत्त्वाचे विषय असल्यामुळे त्यांचाही सखोल अभ्यास या विद्यापीठात होई. यामुळेच शिकंदराने येथून खास पंडित आपल्या देशात नेल्याचा उल्लेख सापडतो.

विशेष अध्यापन

अशा रीतीने सगळ्या विषयांचे सखोल अध्ययन करण्याची व्यवस्था या विद्यापीठात होती हे खरे; परंतु त्यांतल्यात्यात ज्या तीन विषयांच्या अध्यापन – साठी या विद्यापीठाची ख्याती देशोदेशी पसरलेली होती ते विषय म्हणजे वैद्यक, युद्धकला स्थापत्य. बौद्धकालीन सुप्रसिद्ध वैद्य जीवक या विद्यापीठाचा विद्यार्थी, हा एक वेश्यापुत्र. वैद्यकीय ज्ञान मिळविण्यासाठी हा राजगृहातून थेट तक्षशिलेला गेला. तिथल्या प्रसिद्ध आचार्यांजवळ त्याने ७ वर्षे शिक्षण घेतले व तो वैद्यक विषयात नामांकित वैद्यांना मागे टाकण्याइतपत पारंगत झाला विनयपिटकात त्याने एका प्रसिद्ध व्यापा-याच्या डोक्यावर कौशल्याने शस्त्रक्रिया केल्याचा उल्लेख सापडतो. मगध देशाच्या राजा बिंबिसाराने त्याला आपला मुख्य वैद्य’ नेमले असे विनयमहावग्गावरून दिसते. याने भगवान् बुद्ध व राजा चण्डप्रद्योत यांनाही दुखण्यातून बरे केल्याची कथा आहे. सात वर्षे शिक्षण घेतल्यानंतरही गुरूजींनी काहीच न सांगितल्यामुळे यानेच ‘ माझे शिक्षण कधी संपणार ?’ असा प्रश्न विचारला. तेव्हा गुरुजींनी त्याला कुदळ घेऊन तक्षशिलेच्या चारी बाजूंना जाऊन एक योजनाच्या आत औषधयोजनेच्या दृष्टीने निरुपयोगी वनस्पती आणायला सांगितले. जीवकाने तशी भटकंती केली पण त्याला तशी एकही वनस्पती आढळली नाही. परत येऊन गुरुजींना त्याने तसे सांगितले. तेव्हा गुरुजींनी ‘ तू मिळवलेले ज्ञान उपजीविकेला पुरेसे आहे. तुला घरी जायला हरकत नाही’ असे म्हणून त्याला वाटखर्चाला पैसे दिले असे विनयमहावग्गात म्हटलेले आहे. यावरून तक्षशिलेतल्या वैद्यकीय विषयांतील शिक्षणाच्या दर्जाची कल्पना येते. प्रसिद्ध शस्त्रवैद्य म्हणून पुढे नावाजलेल्या जीवकाला ७ वर्षे मिळालेले शिक्षण तक्षशिलेतील आचार्यांच्या दृष्टीने ‘ उपजीविकेला पुरेसेच’ होते हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. जीवक हा बुद्धसमकालीन म्हणजे इसवी सनापूर्वीच्या ६ व्या शतकातला म्हणजेच अलेक्झांड्रिया तील हिरोफिलसच्या तीन शतके आधी व बुखान्यातील प्रसिद्ध वैद्य इबनीसना ( अविसेन्न – अविषण्ण ) याच्या १६ शतके पूर्वी झालेला.

युद्धकलेचा अभ्यास

धनुर्विद्या किंवा युद्धकला यांचे अध्यापन हे तक्षशिलेचे दुसरे वैशिष्ठय. एका वेळी निरनिराळ्या राष्ट्रांतून एकंदर १०३ राजपुत्र येथे धनुर्विद्या शिकत होते असे महासूत सोमजातकात म्हटलेले आहे. येथे शिकविल्या जाणा-या युद्धकलेत भाले, तलवारी वगैरे शस्त्रांबरोबर फेकून मारण्याच्या बाणासारख्या प्रभावी शस्त्रांचा वापर केला जात असे व त्यामुळे त्या काळी प्रसिद्ध असणा-या ग्रीससारख्या पाश्चत्य राष्ट्रांचेही या विद्यापीठाकडे लक्ष असे. रथ व घोडेस्वार यांनी तर पुष्कळच प्रगती केली होती यात नवल नाही. धनुविद्युत निष्णात असून घोड्यावर बसून बाण मारण्यात पटाईत असणा-या पाथियन लोकांनी ही कला भारतीयांपासूनच घेतली होती या विधानाला पुष्टी देणारी वचने प्राचीन ग्रंथांतून कित्येक आढळतात.

स्थापत्यकला व शिल्पकला यांचे तक्षशिलेत दिले जाणारे शिक्षण आजच्या इंजिनियरिंग कॉलेजात दिल्या जाणा-या विपयांच्या शिक्षणाशी मिळते जुळते होते. शिकंदरच्या लढाईनंतर तक्षशिला विद्यापीठाला ग्रीक नमुने पहावयाची संधी मिळाली व त्याचा उपयोग करून घेऊन या विद्यापीठातील आचार्यांनी या धर्तीवर बुद्धाचे सुंदर पुतळे बनवण्याची कला आत्मसात् केली व विद्यापीठातील विद्याथ्र्यांना या कलेचे शिक्षण दिले. ग्रीक इतिहासकारांनी तक्षशिला येथील सूर्य मंदिराचा उल्लेख करताना त्या मंदिराला स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हटलेले आहे. जातकांच्या काळात तक्षशिला नगरीत आजच्या परिभाषेप्रमाणे एक स्वतंत्र ‘ इंजिनियरिंग कॉलेज‘ होते व तेथे एका वेळी पाचशे विद्यार्थी शिक्षण घेत होते या विधानात तत्कालीन तक्षशिलेचा गौरव लक्षात घेतला तर अतिशयोक्ती आहे असे समजण्याचे कारण नाही.

ऋषितुल्य अध्यापक

तक्षशिलेला एवढे मोठे स्थान प्राप्त होण्याचे प्रमुख कारण म्हणजे या विद्यापठाला लाभलेले विद्वान्, निरलस व ऋषितुल्य शिक्षक. या शिक्षकांची प्रशंसा तत्कालीन सिसेरो, प्लिनी सारख्या पाश्चात्य पंडितांनी मुक्तकंठाने केलेली आहे. यांच्या जोरावर जवळ जवळ हजार ते बाराशे वर्षे तक्षशिला विद्यापीठाने अव्याहतपणे उच्च शिक्षण देण्याचे पवित्र कार्य केले. अशा विद्यापीठाचा नाश हूणांच्या आक्रमणांमुळे इ. स. ५०० च्या सुमारास झाला हे कळल्यानंतर ‘कालाय तस्मै नमः’ म्हणण्यावाचून गत्यंतर रहात नाही.

 

प्राचीन तक्षशिला विद्यापीठ( इ. स. पूर्व ८०० ते इ. स. ४०० ) Takshashila ancient University भारतातील प्राचीन विद्यापीठे Ancient Universities in India

About ipledge

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *